टॅक्स भरण्यात दबंग खान नंबर वन,तर चौथ्या नंबरवर कपिल शर्मा

टॅक्स भरण्यात दबंग खान नंबर वन,तर चौथ्या नंबरवर कपिल शर्मा

  • Share this:

tax office hits22 मार्च : मार्च महिना संपत आलाय आणि इनकम टॅक्स भरण्यासाठी लोकांची धावपळ सुरू आहे आणि त्यात बाॅलिवूड अभिनेतेही मागे नाहीत. सलमान खाननं अॅडव्हान्स टॅक्स भरलाय आणि तो आहे 44.5 कोटी रुपये. बाॅलिवूडचा हा सुलतान सर्वात जास्त टॅक्स भरणारा ठरलाय.

गेल्या वर्षी टॅक्स भरण्यात नंबर वनवर असणारा अक्षय कुमार यावेळी दुसऱ्या नंबरवर आहे. गेल्या वर्षी 30 कोटी टॅक्स भरणाऱ्या अक्कीनं या वर्षी 29.5 कोटीचा टॅक्स भरलाय. तर तिसऱ्या नंबरवर आहे हृतिक रोशन. त्यानं 25.5 कोटींचा टॅक्स भरलाय.

टॅक्स भरणाऱ्या बाॅलिवूड अभिनेत्यांच्या यादीत कपिल शर्माचंही नाव आहे.गेल्या वर्षी 7 कोटी टॅक्स भरणाऱ्या कपिलनं यावर्षी 23 कोटींचा टॅक्स भरलाय. बाॅलिवूड स्टार्सच्या पंगतीत त्यानं चवथा नंबर पटकावलाय.

त्या खालोखाल रणबीर कपूरनं 16.5 कोटी तर आमिरनं 14.8 कोटींचा टॅक्स भरलाय.

अॅडव्हान्स टॅक्स भरणाऱ्यांच्या यादीत करण जोहर हा एकमेव दिग्दर्शक आहे. त्यानं 11.7 कोटींचा टॅक्स भरलाय.

अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोणनं 10.25 कोटी, तर आलिया भट्टनं 4.33 कोटी आणि करिना कपूर खाननं 3.9 कोटींचा टॅक्स भरलाय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या यादीत अमिताभ बच्चन,ऐश्वर्या,शाहरूख खान यांची नावं गायब आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2017 04:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading