टाॅम क्रुझचं नवं 'मिशन', एका दृश्यासाठी वर्षभर ट्रेनिंग

टाॅम क्रुझचं नवं 'मिशन', एका दृश्यासाठी वर्षभर ट्रेनिंग

  • Share this:

TOM

22 मार्च : अभिनेता टाॅम क्रुझनं 'मिशन इम्पाॅसिबल 6'मधल्या एका दृश्यासाठी वर्षभर घाम गाळलाय.सिनेमाचा निर्माता डेविड इलिसननंच हे सांगितलंय.मिशन इम्पाॅसिबलच्या सीरिजमधला हा सहावा सिनेमा.

डेविड म्हणाला,' टाॅम क्रुझची ही कामगिरी कौतुकास्पद आहे. सिनेमातले शाॅट्स प्रभावी होण्यासाठी त्यानं वर्षभर ट्रेनिंग घेतलं. 'रग नेशन' सिनेमाचं काम संपल्यावर त्यानं हे ट्रेनिंग घेतलं.

टाॅम क्रुझ सिनेमात स्वत: स्टंट्स करतो. त्यामुळे प्रेक्षकांसाठी त्याचे सिनेमे ही खास ट्रीट असते.

'मिशन इम्पाॅसिबल 6'चं शूटिंग 10 एप्रिलपासून पॅरिस, लंडन आणि न्यूझिलंड इथे सुरू होणार आहे. सिनेमा पुढच्या वर्षी 27जुलैला रिलीज होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 22, 2017, 1:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading