...अन्यथा हाॅस्टेल करा खाली, संपकरी डॉक्टरांना सरकारचा अल्टीमेटम

  • Share this:

doctors185915dl1198

22 मार्च : हायकोर्टाने आदेश देऊनही आज तिसऱ्या दिवशीही निवासी डॉक्टरांनी संप मागे न घेतल्याने राज्य सरकारने आता त्यांच्यावर कारवाई करणाच्या इशारा दिला आहे. कामावर रुजू व्हा अन्यथा हाॅस्टेल खाली करा, असा अल्टिमेटमच राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. याशिवाय, जे निवासी डॉक्टर कामावर येणार नाहीत, त्यांचा सहा महिन्यांचा पगार कापण्याचा इशाराही सरकारने दिला आहे. तर राज्याच्या वैद्यकीय संचालकांकडूनही कामावर न येणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई हायकोर्टाने काल (मंगळवारी) सामूहिक रजेवर गेलेल्या निवासी डॉक्टरांना फटकारलं होतं. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाण्याची भीती वाटत असेल तर जागा खाली करा. रुग्णालय प्रशासन तुमच्या जागी दुसऱ्यांची नेमणूक करेल, असं सुनावत या डॉक्टरांनी तातडीने कामावर रुजू व्हावं अन्यथा रुग्णालय प्रशासनाने त्यांना सेवामुक्त करण्याची कारवाई करावी, असे आदेशही कोर्टाने दिले होते. त्यानंतर आंदोलक नरमतील आणि पुन्हा कामावर रुजू होतील, असा कयास होता. मात्र, आता सरकार आणि वैद्यकीय आंदोलनांच्या भूमिकेमुळे हे आंदोलन आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

सोलापूरमध्ये कोर्टाच्या आदेशानंतर कामावर रुजू न झालेल्या 114 निवासी डॉक्टरांचे निलंबन करण्यात आले आहे. आज सकाळी 10 वाजता या डॉक्टरांनी कामावर होणे अपेक्षित होते. मात्र, डॉक्टरांनी आपला संप कायम ठेवल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता राजाराम पोवार यांनी दिली. त्यामुळे आता डॉक्टरांच्या संघटना काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या सामूहिक रजेबाबत होणारी उच्च न्यायालयातील सुनावणी मुख्य न्यायाधीशांच्या अनुपस्थितीमुळे उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

धुळे, नाशिक आणि मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनांनंतर राज्यभरातील 4500 निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेच्या नावाखाली काम बंद आंदोलन पुकारलं आहे. आज या संपाचा तिसरा दिवस आहे. मात्र, निवासी डॉक्टर काही केल्या माघार घ्यायला तयार नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2017 12:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading