मुस्लीम देशांसाठी विमानात इलेक्ट्राॅनिक वस्तूंवर ब्रिटनची बंदी

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2017 11:17 AM IST

मुस्लीम देशांसाठी विमानात इलेक्ट्राॅनिक वस्तूंवर ब्रिटनची बंदी

bratian

22 मार्च : अमेरिकेनंतर आता ब्रिटननेही 6 मुस्लीम बहुल देशांतील प्रवाशांवर ब्रिटनमध्ये येताना विमानातून इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणण्यास बंदी घातली आहे. यामध्ये टर्की, लेबेनॉन, जॉर्डन , इजिप्त, ट्युनिशिया आणि सौदी अरेबिया या देशांचा समावेश आहे. या देशातील प्रवाशांना विमानात लॅपटॉप, टॅबलेट,डीव्हीडी प्लेयर, आयपॅड आणि मोठ्या आकाराचे मोबाइल फोन नेता येणार नाहीत.

आम्ही हवाई सुरक्षेबाबतचे निर्णय विचारपूर्वक घेतो, प्रवाशांच्या सुरक्षेसोबत तडजोड करता येणार नाही असं ब्रिटन सरकारच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. सुरक्षाकारणास्तव खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचं कारण ब्रिटनने दिलं आहे. यापूर्वी मंगळवारी अमेरिकेच्या ट्रम्प सरकारनेही 10 मुस्लीम बहुल देशांतील प्रवाशांना अमेरिकेत जाताना इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणण्यावर बंदी घातली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2017 08:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...