हायकोर्टाच्या फटकाऱ्यानंतरही राज्यातले डाॅक्टर रजेवरच

  • Share this:

DOCTOR STRIKE

22 मार्च : मुंबई  हायकोर्टाने फटकारल्यानंतरही मुंबईतील डॉक्टरांनी सामूहिक रजा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कामबंद करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

डॉक्टरांना होत असलेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या सुरक्षेच्या मागणीसाठी राज्यभरातील शासकिय निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेले होते. मात्र आता या काही डॉक्टरांनी कारवाईच्या भीतीने काम सुरू केल्याचे समजते. पुण्याच्या ससून रुग्णालयातील १५० निवासी डॉक्टर रुजू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता विविध शहरांमध्ये वेगवेगळी भूमिका डॉक्टर घेतायेत असं दिसतंय.

डॉक्टरांच्या सामूहिक रजेविरोधातील याचिकेवर काल मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी मुंबई हायकोर्टाने  रजेवर गेलेल्या डाॅक्टरांना चांगलंच फटकारलं आहे.  तरीही आज सकाळपासून राज्यभरातल्या सर्व निवासी डॉक्टरांनी बंद पुकारल्यानं रुग्णसेवा ठप्प पडली आहे.

मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा, अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने संपकरी निवासी डॉक्टरांना फटकारलं. एखाद्या कामगाराप्रमाणे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जर डॉक्टर संपाचं हत्यार उपसत असेल तर त्यांचं वर्तन हे डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारं आहे, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. पण रुग्णांचे हाल होत असले तरीही जीव वाचवणाऱ्याला कोण वाचवणार, हाच पवित्रा निवासी डॉक्टरांनी मंगळवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्येही कायम ठेवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2017 09:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading