ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचं अमेरिकेत निधन

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2017 09:01 AM IST

ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचं अमेरिकेत निधन

187c68_282cae5ed7ae42f09a52ca14e148fb5e-mv2_d_4128_2322_s_2

22 मार्च :  ज्येष्ठ पत्रकार, लेखक, महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक गोविंद तळवळकर यांचं काल रात्री अमेरिकेत निधन झालं. ते 91 वर्षांचे होते.

गोविंद तळवलकरांनी 1947 साली बी.ए. झाल्यानंतर शंकरराव देव यांच्या नवभारतमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे 1950 ते 1962 अशी बारा वर्षे ते लोकसत्तामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत होते. 1962-67 च्या दरम्यान त्यांना महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करण्याची संधी मिळाली. 1968 मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि पुढे 1996 पर्यंत म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस वर्षे महाराष्ट्र टाइम्ससारख्या अग्रणी वृत्तपत्राचे संपादक म्हणून आपली कारकीर्द त्यांनी गाजवली. महाराष्ट्र टाइम्सला महाराष्ट्रातील एक प्रभावी, परिणामकारक दैनिक म्हणून घडविण्यात तळवलकरांचा सिंहाचा वाटा आहे.

अग्रलेखांचा बादशाह अशी गोविंद तळवलकरांची ओळख होती. टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॅडिकल ह्युमनिस्ट, फ्रंटलाइन अशा इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांतूनही तळवलकरांनी लेखन केलं आहे. सध्या ते एशीयन एजसाठी लिहीत होते.

तळवलकरांनी एकूण २५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास असणारे व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी वेळोवेळी केलेले सडेतोड लिखाण आजही वाचकांच्या स्मरणात आहे. तळवळकर यांना पत्रकारिकेत उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार, बी.डी.गोयंका, दुर्गारतन अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2017 08:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...