S M L

तुकाराम मुंढेंच्या कार्यपद्धतीविरोधात 116 नगरसेवक घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Sachin Salve | Updated On: Mar 21, 2017 10:44 PM IST

tukaram_mundhe21 मार्च : नवी मुंबईत पुन्हा एकदा नगरसेवकांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात आघाडी उघडलीये. मुंढेंच्या कार्यपद्धतीच्या विरोधात उद्या सर्वपक्षीय 116 नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.

राज्य सरकारने सादर केलेल्या अनधिकृत घरे नियमित करण्याच्या धोरणावर आयुक्त मुंढे यांनी सर्वसाधारण सभेला विश्वासात न घेता राज्य सरकाच्या या धोरणाला विरोध करणारं पत्र दिलंय. तुकाराम मुढेंनी केलेल्या विरोधाचे सभागृहात पडसाद उमटले. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला फैलावर घेतलं. याबद्दल 116 नगरसेवक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. तसंच शहरातील अनधिकृत इमारती राज्य सरकारच्या धोरणात सामावून घेण्यासाठी मुख्यमंञ्यांना विनंती करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2017 10:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close