S M L
Football World Cup 2018

नगरमध्ये सेनेचा आघाडीला पाठिंबा, भाजपला धोबीपछाड

Sachin Salve | Updated On: Mar 21, 2017 09:56 PM IST

नगरमध्ये सेनेचा आघाडीला पाठिंबा, भाजपला धोबीपछाड

21 मार्च : अहमदनगर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद आघाडीनं पटकावलंय. अध्यक्षपदी काँग्रेसच्या शालिनी विखे पाटील यांची तर उपाध्यक्ष पदासाठी राजश्री घुले यांची बहुमतानं निवड झालीय. शिवसेनेच्या सहा सदस्यांनी आघाडीला पाठिंबा दिलाय. सेनेनं भाजपला धोबीपछाड दिल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.

विखे यांनी भाजपच्या सदाशिवराव पाचपुते यांचा ३३ मतांनी पराभव केलाय. विखे यांना ७१ पैकी ५२ तर पाचपुते यांना १९ मतं पडली. शालिनी विखे यांनी तिसऱ्यांदा झेडपीचं अध्यक्षपद पटकावलंय. तर उपाध्यक्ष घुले यांनी भाजप क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या दादासाहेब शेळके यांचा 31 मतांनी पराभव केला.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पदावरुन राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. मात्र विखे यांनी थोरात यांच्यावर कुरघोडी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2017 09:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close