आली लहर केला कहर,सिंहाच्या पिजऱ्यावर बसून आला नवरदेव

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 21, 2017 08:22 PM IST

आली लहर केला कहर,सिंहाच्या पिजऱ्यावर बसून आला नवरदेव

multan_marirdge 21 मार्च : तुम्ही आजपर्यंत अनेक शाही लग्नसोहळे पाहिले असतील, लाखो रुपये खर्च करुन प्रत्येक जण आपल्या लग्नाला इतरांच्या लग्नापेक्षा अधिक दिमाखदार आणि अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करत असतात. काही जण हवेत लग्न करतात, तर काही जण  समुद्राखाली जाऊन लग्न करतात. परंतु आपला शेजारील देश पाकिस्तानमध्ये एक अजब लग्नसोहळा पार झाला. आणि या लग्नाच महत्व म्हणजे, या लग्नातील नवरदेवाने त्याची वरात चक्क सिंहावरुन काढली.

पाकिस्तानमधील हा लग्नसोहळ्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये एका नवरदेवाची शाही वरात निघाली आहे.परंतु हा नवरदेव कोणत्या गाडीमधून, घोडीवरुन वगैरे नाही तर चक्क सिंहाच्या पिंजऱ्यावरुन या वरात निघाली. या पिंजऱ्यावर नवरदेवाची खुर्ची बांधलेली होती, आणि हा नवरदेव एखाद्या राजाप्रमाणे त्या खुर्चीवर विराजमान होता. भरात भर म्हणजे नवरदेवाचा सेहरा हा सोन्याचा होता.

आता हे शाही लग्न इथेच थांबत नाही. या लग्नात वरपक्षाला मोठ्याप्रमाणात हुंडासुद्धा मिळाला आहे. नवऱ्यामुलाचे कपडे हे सोन्याने मढलेले होते. आणि याचप्रमाणे नवऱ्यामुलाच्या प्रत्येक भांवडांला वधूपक्षाकडुन भेट म्हणून बाईक देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2017 08:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...