S M L

झेडपीत सत्तेसाठी कायपण, कुठे काय घडलं?

Sachin Salve | Updated On: Mar 21, 2017 07:01 PM IST

झेडपीत सत्तेसाठी कायपण, कुठे काय घडलं?

21 मार्च : आज (मंगळवारी) राज्यभरात पार पडलेल्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी सत्तेसाठी कायपण अशीच परिस्थिती बघायला मिळाली. स्थानिक नेतृत्वांनी आपल्या राजकीय स्पर्धकांना मात देण्याच्या नादात अनेक ठिकाणी अभद्र युती आणि आघाडी केल्याचं बघायला मिळालं. तर काही ठिकाणी आपल्या पक्षातल्या बंडखोरांमुळे हातातोंडाशी आलेली सत्ता राजकीय पक्षांना गमवावी लागली..पाहुयात कुठे नेमकं काय घडलं.

कुठे काय घडलं ?

कोल्हापुरात शिवसेनेत फूट पाडून भाजप सत्तेवर

चंद्रकांत पाटील, महाडिक यांच्या मोर्चेबांधणीला यश

Loading...
Loading...

बीडमध्ये राष्ट्रवादीच्या सुरेश धस गटाने बंडखोरी झाल्याने भाजपची सत्ता

राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंना धस यांच्या मदतीने पंकजा मुंडेंचा दे धक्का

सोलापुरात मोहितेपाटलांना धक्का, महाआघाडीचे संजयमामा शिंदे अध्यक्षपदी

सोलापुरात संख्याबळ असूनही राष्ट्रवादीची ऐनवेळी माघार

नाशिक, औरंगाबादेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात शिवसेनेला यश

नाशिक, औरंगाबादमध्ये काँग्रेसच्या मदतीने शिवसेना सत्तेवर

यवतमाळमध्ये सेनेला धक्का, भाजप, काँग्रेस सत्तेसाठी एकत्र

उस्मानाबादमध्ये भाजपच्या मदतीने राष्ट्रवादीची सत्ता, सेना, काँग्रेसला धक्का

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2017 07:01 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close