S M L
Football World Cup 2018

वेबसीरिजमध्ये अतुल कुलकर्णी साकारतोय कर्नल साठ्ये

Sonali Deshpande | Updated On: Mar 21, 2017 06:31 PM IST

वेबसीरिजमध्ये अतुल कुलकर्णी साकारतोय कर्नल साठ्ये

21 मार्च : नागेश कुकुनुर दिग्दर्शित वेबसीरिजमध्ये अतुल कुलकर्णी ब्रिगेडियर साठ्ये ही व्यक्तिरेखा साकारतोय. एकता कपूरच्या ह्या नव्या वेबसीरिजमधील  अतुलची  भूमिका स्पेशल फोर्सच्या अधिकाऱ्याची  आहे. सैनिकांना खास प्रशिक्षण देणा-या सैन्यातल्या अधिका-याच्या भूमिकेत अतुल कुलकर्णी दिसेल.

यावर अतुल कुलकर्णी म्हणतो, 'एक अभिनेता म्हणून मी माझ्या करियरमध्ये, नेहमीच आव्हानात्मक भूमिका आणि कथांची निवड करत आलोय. जेव्हा मला नागेशने ही भूमिका ऑफर केली तेव्हा मी ती साकारण्यासाठी खूप उत्सुक होतो. कारण अनेक प्रेक्षकांना अशा भूमिका खूप आवडतात आणि ह्या एका वेगळ्या अद्भुत जगाबद्दल आपल्याला खूप कमी माहिती असते. नागेशसोबत ह्या प्रोजेक्टमध्य़े काम करणं एक चांगला अनुभव आहे.'

या वेबसीरिजचं अजून नाव ठरायचं आहे. नागेश कुकनुर दिग्दर्शित ही वेबसीरिज ऑल्ट बालाजीवर पाहता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2017 06:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close