S M L

नाशिकमध्ये काँग्रेसच्या मदतीने सेनेचा भगवा फडकला, भाजप- राष्ट्रवादीची हातमिळवणी वाया

Sachin Salve | Updated On: Mar 21, 2017 07:29 PM IST

abad_congress_sena

प्रशांत बाग,नाशिक

21 मार्च : नाशिकचं मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेवर शिवसेनेनं भगवा फडकवण्यात यश मिळवलंय. अखेरपर्यंत चुरस टिकलेल्या अध्यक्षपद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मंदाकिनी बनकर यांचा अवघ्या 2 मतांनी पराभव करत शिवसेनेच्या शीतल सांगळे यांनी विजय मिळवला. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या साथीनं काँग्रेसच्या नयना गावित यांनी विजय मिळवताना भाजपच्या आत्माराम कुंभार्डे यांचा 2 मतांनी पराभव केला.पालिकेवर निर्विवाद सत्ता मिळवलेल्या भाजपला जिल्हा परिषदेपासून दूर ठेवण्यासाठी आक्रमक झालेल्या शिवसेनेनं काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यानं काँग्रेसचा हात 'शिवसेना के साथ' असं नवीन राजकीय समीकरणं जन्माला आलंय. आता ही अनैसर्गिक युती 5 वर्ष टिकणार की अशी चर्चा सुरू झालीये.

नाशिक महापालिकेत भाजपला मिळालेली एकहाती सत्ता हे शिवसेनेच्या चांगलंच जिव्हारी लागलं होतं आणि हीच नांदी होती जिल्हा परीषद निवडणुकीची.पण बहुमत कुणालाच नसल्यानं सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेनं काँग्रेससह अपक्षांची मोट बांधली. पण सत्तेच्या किल्ल्या होत्या त्या 3 सदस्य असलेल्या माकपच्या हातात. पण शिवसेनेच्या सदस्यांसोबत सभागृहात माकपचे सदस्य आले त्याचवेळी सेनेचा भगवा फडकणार हे निश्चित झालं. अखेर राष्ट्रवादीची सत्ता शिवसेनेनं ताब्यात घेतली.

खरं तर भाजपनं अखेरपरपर्यंत शिवसेनेशी जमवून घेण्याचा प्रयत्न केला. पण या दोघांतील टोकाला गेलेल्या संघर्षाचा फायदा हा अवघ्या 7 जागा मिळवलेल्या काँग्रेसला झाला आणि काँग्रेसका हात 'शिवसेना के साथ' हे समीकरण जन्माला आलं. अर्थातच उपाध्यक्षपदाचा फायदाही काँग्रेसला झाला.

Loading...
Loading...

शिवसेनेच्या राज्यमंत्री दादा भुसे त्यांच्यासाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. कारण त्यांच्या मतदारसंघात सेनेचा झालेला दारुण पराभव या सत्तेसाठी त्यांनी पडद्यामागे केलेल्या हालचाली, माकपचा मिळवलेला यशस्वी पाठिंबा यामुळे सत्ताही आली आणि त्यांचं मंत्रीपदही वाचलं.

निवडणुकीत एकमेकांवर चिखलफेक करणारे हे राजकीय पक्ष, या सत्तेच्या सारीपाटात कश्या सोंगट्या फेकतात ते आज स्पष्ट झालं. काँग्रेस-राष्ट्रवादीवर घणाघाती आरोप करीत यश मिळवणाऱ्या शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षात कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. आणि याचाच फायदा काहीश्या अडचणीत सापडलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला पुन्हा कमबॅक करण्यासाठी होतोय. यामुळेच सत्तेच्या या सारीपाटात कोणताच राजकीय पक्ष हा एकमेकांचा शत्रू फक्त निवडणूक प्रचारापुरताच असतो हेच खरं.

- जिल्हा परिषदेत महिलाराज कायम

- शिवसेनेचा भगवा फडकला

- शिवसेनेच्या शीतल सांगळे अध्यक्ष

- राष्ट्रवादीच्या मंदाकिनी बनकर यांचा 2 मतांनी केला पराभव

- सांगळे याना मतं 37 तर बनकर याना 35 मतं

- काँग्रेस,अपक्ष आणि माकपची शिवसेनेला साथ

- भाजप मतदारांनी केलं राष्ट्रवादीच्या उमेदवारास मतदान

- काँग्रेसच्या नयना गावित उपाध्यक्ष

- भाजपच्या आत्माराम कुंभार्डे यांचा 2 मतांनी केला पराभव

- गावित याना मतं 37 तर कुंभार्डे याना 35 मतं

- शिवसेना,अपक्ष आणी माकपची काँग्रेसला साथ

- राष्ट्रवादी मतदारांनी केलं भाजपच्या उमेदवारास मतदान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2017 06:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close