S M L

उस्मानाबादेत भाजप-राष्ट्रवादीची यारी, सेनेला पडली भारी

Sachin Salve | Updated On: Mar 21, 2017 05:27 PM IST

bjp_ncp21 मार्च : उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकलाय. अध्यक्षपदी नेताजी पाटील तर उपाध्यपदी अर्चना पाटील यांची निवड झालीये.

उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. विशेष म्हणजे भाजपच्या मदतीने राष्ट्रवादीने सेनेच्या उमेदवाराचा पराभव केला.  भाजपने सभागृहात उपस्थित न राहता राष्ट्रवादीला मदत केली. त्यामुळे सेनेचे दोन्ही 2 उमेदवार गैरहजर राहिले. 26-23, 26-23 मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले.

जिल्हा परिषदांमध्ये अनेक ठिकाणी शिवसेनेनं काँग्रेसची मदत घेऊन भाजपला दूर सारलं. भाजपनेही सेनेला धडा शिकवत राष्ट्रवादीला पाठिंबा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2017 05:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close