21 मार्च : बीड जिल्हा परिषद निवडणुकीत महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना चांगलाच दणका दिलाय. राष्ट्रवादीच्या जास्त जागा असून सुद्धा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भाजपकडे गेलंय.
बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली. माजी मंत्री सुरेश धस यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसला.
सुरेश धस यांचे समर्थक 7 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीची संख्या अधिक असतानाही भाजपला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं. भाजपला 35 तर राष्ट्रवादीला 25 आकडा मत मिळाली. सविता विजय गोल्हार यांची अध्यक्षपदी निवड झाली. तर जयश्री म्हस्के यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
काय घडलं ?
राष्ट्रवादीचे एकूण 24 सदस्य निवडून आलेत. मात्र काँग्रेसचे 2 सदस्य राष्ट्रवादीला पाठिंबा देऊ शकतात. तर काँग्रेसच्या निवडून आलेल्या एकूण 3 सदस्यांपैकी 1 सदस्य भाजपच्या गळाला लागले.
भाजपचे एकूण 19 आणि एक भाजप पुरस्कृत असं 20 एवढं संख्याबळ आहे. सुरेश धस यांच्या गटानं भाजपला मतदान करण्याचा निर्णय घेतल्याने, जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपकडे येण्याचा मार्ग सुकर झाला. सुरेश धस यांचे 7, काँग्रेस 1 आणि शिवसंग्रामच्या चार सदस्यांचाही भाजपला पाठिंबा मिळाला. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 32 पर्यंत पोहचलं. अखेर आज नाट्यमय घडामोडीनंतर भाजपच्या पारड्यात 35 मतं पडली. आणि राष्ट्रवादीच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा