भीती वाटत असेल तर जागा खाली करा, हायकोर्टने डाॅक्टरांना फटकारलं

भीती वाटत असेल तर जागा खाली करा, हायकोर्टने डाॅक्टरांना फटकारलं

  • Share this:

doctors-strike-at-kem_b808e15c-646f-11e5-b95f-5445df9fcc89

21 मार्च :  तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाण्याची भीती वाटत असेल तर जागा खाली करा. रुग्णालय प्रशासन तुमच्या जागी दुसऱ्यांची नेमणूक करेल अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने मारहाणीच्या निषेधार्थ सामूहिक रजेवर गेलेल्या आंदोलक डॉक्टरांना फटकारलं आहे.  सुट्टीच्या नावाखाली संप करणे हा मूर्खपणा व अराजकता निर्माण करण्याचा प्रकार आहे,  असं वर्तन म्हणजे डॉक्टरी पेशाला काळीमाच आहे,' असंही कोर्टाने सुनावलं आहे. त्याचबरोबर, याचिकेवरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मात्र तोपर्यंत सर्व सदस्य डॉक्टरांना कामावर रुजू होण्यास सांगा, असे आदेशही न्यायालयाने दिले.

डॉक्टरांच्या सामूहिक रजेविरोधातील याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुलेमान मर्चंट कोर्टात हजर होते.

निवासी डाॅक्टरांच्या राज्यभरातील सामूहिक रजेवरुन मुंबई उच्च न्यायालयाने चांगलंच फटकारलं आहे. राज्यभरातील साडेचार हजार निवासी डॉक्टरांच्या या आंदोलनामुळे काल सकाळपासून ५८ लोकांचा मृत्यू झाला, असे अॅड. माने यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. आपल्या सांगण्यावरून निवासी डाॅक्टर सामूहिक रजेवर गेलेले नाहीत तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. तसंच आपल्यावर हल्ला होण्याच्या भीतीनं डाॅक्टर्स हाॅस्पीटल्समध्ये येत नाहीत, अशी भूमिका मार्डनं घेतल्यानंतर हायकोर्टानं त्यांना चांगलंच फैलावर घेतलं. डाॅक्टर जर आपलं कर्तव्य पार पाडू शकत नसतील तर ते आपलं काम करण्यास अपात्र आहेत असंच म्हणावं लागेल अशी टिप्पणी कोर्टाने केली.

डाॅक्टर एखाद्या कारखानातल्या कामगाराप्रमाणे वागू शकत नाही असही कोर्टाने सुनावलं. जर मार्डचे सदस्य असलेले डाॅक्टर्स त्याचं ऐकत नाहीत तर मग त्यांना संघटनेतून काढून का टाकत नाहीत असा परखड सवालही कोर्टाने विचारला. मार्डनं प्रतिज्ञापत्र सादर करुन आपली भूमिका स्पष्ट करावी असा आदेश कोर्टाने दिला आहे. जे निवासी डाॅक्टर सुरक्षेच्या मुद्यावर कामावर येत नाहीयंत, त्या संबंधीत हाॅस्पिटल प्रशासनानं निवासी डाॅक्टरांना कायमचे सुट्टीवर पाठवायचे हे ठरवावे असंही कोर्टाने म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2017 04:04 PM IST

ताज्या बातम्या