तू देव नाहीस कपिल- सुनील ग्रोवर

तू देव नाहीस कपिल- सुनील ग्रोवर

  • Share this:

sunil-grover

21 मार्च : कपिल शर्माचं थप्पडकांड अजूनही गाजतेय. सुनील ग्रोवर कपिलच्या या वागणुकीमुळे खूप दुखावला गेलाय. त्यानं कपिलला ट्विटरवर पत्र लिहून नाराजी व्यक्त केलीय. 'तू देव नाहीस,हे लक्षात ठेव' असं सुनीलनं लिहिलंय, तर कपिलनं आधीत ट्विटरवर सुनीलची माफी मागितली होती.

सुनीलनं ट्विटरवर मोठी पोस्ट लिहिलीय. त्यात तो खूप दुखावला गेल्याचंही म्हटलंय.सुनीलनं लिहिलंय, 'सगळे काही तुझ्यासारखे हुशार आणि टॅलेंटेड नसतात, पण तू ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, त्यांचा आदर करायला शिक.'

तो असंही म्हणाला,' बरं झालं कळलं की हा तुझा शो आहे. तू या शोमधून कुणालाही बाहेर काढू शकतोस.' शेवटी सुनीलनं कपिलला यशासाठी शुभेच्छाही दिल्यात. कपिलनं सुनीलची ट्विटरवर याआधी माफी मागितली होतीच. आता सुनील इतका दुखावलाय की कपिल त्याला कसा मनावतो,ते पाहायचं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 21, 2017, 9:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading