LIVE : जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

  • Share this:

ZPaj;dja;jpg

LIVE UPDATE :

 कोल्हापूर - झेडपीत कमळ फुलले

अध्यक्षपदी भाजपच्या शौमिका महाडिक

उपाध्यक्षपदी सेनेचे सर्जेराव पाटील

कोल्हापूर शिवसेनेत उभी फूट

महादेवराव महाडिक ठरले किंगमेकर

सांगली - झेडपीत भाजपची सत्ता

अध्यक्षपदी भाजपचे संग्रामसिंह देशमुख

सांगली झेडपीत पहिल्यांदाच भाजपची सत्ता

 उस्मानाबाद - झेडपीत राष्ट्रवादीची सत्ता

अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेताजी पाटील

उपाध्यक्षपदी अर्चना पाटील

भाजपही सत्तेत सामील होणार

यवतमाळ - झेडपीत काँग्रेस-भाजपची युती

अध्यक्षपदी काँग्रेसच्या माधुरी आडे

उपाध्यक्षपदी भाजपचे श्याम जयस्वाल

गडचिरोली - झेडपीत भाजपचं कमळ फुललं

अध्यक्षपदी भाजपच्या योगिता भांडेकर

उपाध्यक्षपदी अजय कंकडालवार

नाशिक : गिरीष महाजनला धक्का, जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा

शिवसेनेच्या शीतल सांगळे अध्यक्ष तर काँग्रेसच्या नयना गावित उपाध्यक्ष

परभणी - जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्वला राठोड, तर उपाध्यक्षपदी भावना नखाते बिनविरोध निवड

 लातूर - जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे मिलिंद लातुरे तर उपाध्यक्ष पदी रामचंद्र तिरुके यांची निवड

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत विखे-थोरात मनोमिलन

अध्यक्षपदी भाजपचे शालिनी विखे तर उपाध्यक्षपदी राजश्री चंद्रशेखर घुले यांची निवड

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

21 मार्च : राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आज, मंगळवारी  अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडी होणार आहेत. भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेत नव्या आघाडीचा अध्याय सुरू झाला आहे. सिंधुदुर्गात वगळता बाकी कुठेही शिवसेना आणि भाजप युती होणार नाही आहे. या उलट या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार हे जवळपास निश्चित आहे.

औरंगाबाद आणि जालनामध्ये नवीन राजकीय आघाडी उदयास आली आहे. औरंगाबादेत शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आली आहे. शिवसेनेकडे 18 तर काँग्रेसकडे 16 सदस्य असून सत्ता स्थापनेसाठी 31 सदस्यांची गरज आहे. ही आघाडी झाल्यामुळे आता शिवसेनेचा अध्यक्ष तर काँग्रेसला उपाध्यक्ष मिळणार आहे. तर जालनामध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे. पण उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्तेसाठी विचित्र युती होण्याची चिन्हं आहेत. अनेक पक्ष ऐनवेळी खेळी करून अध्यक्षपद  खिशात घालणार, हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

सत्तेसाठी कशी जुळली समिकरणे?

मराठवाडा :

औरंगाबादमध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र

जालनामध्ये शिवसेना - राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र

बीडमध्ये सुरेश धस गटाचे 7 सदस्य भाजपला पाठिंबा

पश्चिम महाराष्ट्र :

सांगलीमध्ये भाजपने 60 पैकी 25 जागांवर विजय मिळवला असला तरी मॅजिक फीगर गाठण्यासाठी आणखी सहा जागांची आवश्यकता

17 जागांवर विजय मिळवलेल्या राष्ट्रवादीचं आव्हान भाजपसमोर

भाजप - 25 शिवसेना - 3 रयत विकास आघाडी - 2 = 30

कोल्हापुरात शिवसेनेने भाजपसोबत जाण्यास नकार

67 सदस्यसंख्या असलेल्या कोल्हापूरात कोणत्याही स्पष्ट बहुमत नाही

शिवसेना 10, काँग्रेस 14 आणि राष्ट्रवादी 11 जागा असं समीकरण जुळण्याची शक्यता

उत्तर महाराष्ट्र :

नाशिकमध्ये माकप किंगमेकर

शिवसेना काँग्रेसला साथ देणार

दोघांकडे मिळून ३४ सदस्य आहेत

तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे ३५ सदस्य

त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिसट पक्षाचे चार सदस्य ज्याला पाठिंबा देतील, त्या आघाडीचा अध्यक्ष होईल.

विदर्भ :

अमरावतीमध्ये  भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागण्याची शक्यता

59 सदस्यसंख्या

बहुमताचा आकडा -30

कॉग्रेस आणि शिवसेना एकत्र काँग्रेस 26 सेना 03

आर पी आय 1 बंडखोर राष्ट्रवादी 2 अपक्ष 2

यवतमाळ जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही.

बहुमताचा आकडा 32

शिवसेना 20 राष्ट्रवादी 11 एका अपक्षाची सोबत = 32

भाजपा 18 काँग्रेस 11 दोघांची गरज एक अपक्ष

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये भाजपचं वर्चस्व आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा आणि गडचिरोली याठिकाणी सर्वात मोठा पक्ष भाजप

कोकण :

सिंधुदुर्गमध्ये काँग्रेसचे बहुमत

रत्नागिरीमध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2017 11:22 AM IST

ताज्या बातम्या