News18 Lokmat

दुसऱ्या दिवशीही डॉक्टर सामूहिक रजेवर

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 21, 2017 04:05 PM IST

दुसऱ्या दिवशीही डॉक्टर सामूहिक रजेवर

doctors185915dl1198

21 मार्च :  डॉक्टर मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईच्या सायन रुग्णालयात डॉक्टरला झालेल्या मारहाणीविरोधात डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे मात्र प्रचंड हाल सुरु आहेत.

हॉस्पिटलबाहेर रुग्णांच्या रांगा मोठ्या लागल्या आहेत. दुसरीकडे डॉक्टरांच्या सामूहिक रजेविरोधातील याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. निवासी डॉक्टरांचा संप बेकायदेशीर असून सामूहिक रजेवर जाऊन डॉक्टरांनी कोर्टाचा अवमान केला, असा दावा याचिकेत केला आहे.

दरम्यान निवासी डॉक्टर नियमांनुसार कामावर रुजू झाले नाहीत तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिला आहे.

राज्यातले निवासी डॉक्टर आजही सामूहिक रजेवर आहेत. यामुळे राज्यभरात 400 शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. सोमवारी रुग्णालयांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू होती. आजही हजारो रुणांचे हाल आणि वणवण होणार हे नक्की आहे.

Loading...

मार्डच्या डॉक्टरांच्या नेमक्या मागण्या काय?

– डॉक्टरांवरील हल्ले टळण्यासाठी डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट 2010ची परिणामकारक अंमलबजावणी करा

– डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी

– निवासी डॉक्टरांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा

– सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2017 09:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...