S M L

सोलापूर जि.परिषदेत भाजपचा सत्तेचा दावा, कुणाचा घेणार पाठिंबा ?

Sachin Salve | Updated On: Mar 20, 2017 08:53 PM IST

सोलापूर जि.परिषदेत भाजपचा सत्तेचा दावा, कुणाचा घेणार पाठिंबा ?

20 मार्च : सोलापूर जिल्हा परिषदेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केलाय. अवघे सतरा सदस्य निवडून आले असतानाही भाजप जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार असा दावा केलाय.

राज्यभर झालेल्या पडझडीतही सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसने 25 जागा जिंकत आपला गड राखलाय. तर भाजपाला 17 जागा मिळाल्या आहेत. त्यातच काँग्रेस आणि इतर पक्षांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असला तरी राष्ट्रवादीने अद्यापही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक सदस्य निवडून आलेले असतानाही वेट अँड वॉच अशी भूमिका घेतलीये.

काँग्रेस पक्षाकडे जादा सदस्य असताना देखील त्यांनी अद्याप आपला अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला नाही तर याउलट भाजप आणि आघाडीच्या वतीने अध्यक्ष्यपदासाठी संजय शिंदे हे उमेदवार घोषित करण्यात आलेत.संख्याबळ नसताना भाजपने आघाडीच्या माध्यमातून विधानपरिषद निवडणुकीत आपले उमेदवार प्रशांत परिचारक यांना निवडून आणलं होतं. तोच फॉर्मुला सध्या भाजप वापरात असल्याचं दिसतंय.असे आहे संख्याबळ

- राष्ट्रवादी - २५

- काँग्रेस - ७

Loading...

- भाजपा- १७

- शिवसेना  - ५

- समाधान अवताडे गट - ३

- शहाजी बापू पाटील गट -  २

- भीमा आघाडी - ३

-  शेकाप- ३

- अपक्ष - ३

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2017 08:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close