जि.परिषदेसाठी काँग्रेसची साथ नको, सेनेनं प्रस्ताव धुडकावला

Sachin Salve | Updated On: Mar 20, 2017 07:25 PM IST

uddhav_thackery_nsk20 मार्च :  जिल्हा परिषदांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेची मदत घेण्याची तयारी काँग्रेसनं दाखवलीये. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तसे स्पष्ट संकेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलेत.  मात्र शिवसेनेनं काँग्रेसचा हा प्रस्ताव स्पष्ट शब्दात धुडकावलाय.

जिल्हा परिषदांमध्ये भाजपनं चांगलं यश मिळवलंय. मात्र सत्तास्थापनेच्या गणितात त्यांना शिवसेना किंवा इतर पक्षांची मदत लागणार आहे. काँग्रेसनं अशा ठिकाणी शिवसेनेला साथ देऊन भाजपला सत्तेपासून दूर  ठेवण्याची रणनिती आखलीये. ज्या ठिकाणी भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल अशा ठिकाणी काँग्रेस शिवसेनेला मदत करण्यासाठी तयार झाली होती. पण शिवसेनेनं आता काँग्रेसला साथ देणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2017 07:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close