मोदींनी भेट दिलीच नाही, सेनेचे नेते हात हलवत परत आले -नारायण राणे

  • Share this:

rane_sot3242120 मार्च : शिवसेनेत दम नाही, शिवसेना भाजपबरोबर फरफटत चाललीय अशी टीका काँग्रेसचे नेते नारायण राणेंनी केली. तसंच दिल्लीत गेलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाला पंतप्रधान मोदींची भेट दिलीच नाही. त्यामुळे हात हलवत त्यांना परत यावं लागलं असा टोलाही त्यांनी लगावला.

नारायण राणे यांनी शिवसेनेवर चांगलाच हल्लाबोल केला.  कर्जमुक्ती होईपर्यंत अर्थसंकल्प होऊ न देण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेवर नारायण राणेंनी चांगलीच  टीका केलीय. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सेनेचे आमदार वेलमध्ये उतरले, कर्जमुक्तीच्या मागणीसाठी दिल्लीला गेले, अरूण जेटलींनी यांना फक्त सरबत पाजलं आणि परत पाठवलं. पंतप्रधानांनी यांना साधी भेटही दिली नाही. त्यामुळे सेनेच्या शिष्टमंडळाला हात हलवत परत यावं लागलं अशी टीका त्यांनी केलीय.

तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बाबासाहेब पुरंदरे यांना हाताशी धरून शिवरायांची बदनामी केली असा आरोपही राणेंनी केलाय. शिवरायांविषयीच भाजपचं प्रेम खोटं असल्याचा आरोप करत, अरबी समुद्रातील स्मारकाला आवश्यक त्या परवानग्या मिळण्यापूर्वीच स्मारकाच्या उद्घाटनाचा डाव महापालिका निवडणुकीच्य़ा तोंडावर खेळला गेला असल्याचा आरोपही राणेंनी केलाय.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या आराखड्याचा अजून पत्ता नाही आणि स्मारकाबद्दल फक्त मोठ्या गप्पा होतायत हे दुर्देवी असल्याचंही राणे यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2017 07:20 PM IST

ताज्या बातम्या