S M L

शिवसेनेशी घरोबा करायला काँग्रेस तयार?,अशोक चव्हाणांचे संकेत

Sachin Salve | Updated On: Mar 20, 2017 07:27 PM IST

 शिवसेनेशी घरोबा करायला काँग्रेस तयार?,अशोक चव्हाणांचे संकेत

20 मार्च : जिल्हा परिषदांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेची मदत घेण्याची तयारी काँग्रेसने दाखवलीये. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहे.

अनेक जिल्हा परिषदांमध्ये भाजपनं चांगलं यश मिळवलंय. मात्र सत्तास्थापनेच्या गणितात त्यांना शिवसेना किंवा इतर पक्षांची मदत लागणार आहे. काँग्रेसनं अशा ठिकाणी शिवसेनेला साथ देऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनिती आखलीये. ज्या ठिकाणी भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल अशा ठिकाणी काँग्रेस शिवसेनेला मदत करण्यासाठी तयार झालीये. आता शिवसेना यावर काय प्रतिसाद देतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

एवढंच नाहीतर औरंगाबाद जिल्ह्यात  नगर पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेनं युती केलीये. सेना आणि काँग्रेसनं एकत्र येवून जिल्ह्यातील आठपैकी पाच पंचायती समिती ताब्यात घेतल्यात. काँग्रेस-शिवसेना युतीनं औरंगाबाद आठपैकी पाच पंचायत समित्यांमध्ये शिवसेना-काँग्रेसनं सत्ता स्थापन केलीये. भाजपला जिल्ह्यात चांगलं यश मिळूनसुद्धा शिवसेनेच्या तिरक्या चालीनं भाजप गारद झालीये. भाजपला चांगलं यश मिळवून सुध्दा काँग्रेस आणि सेनेनं भाजपला बाजूला ठेवून पंचायत समितीची सत्ता मिळवली.

संबंधित बातम्या

» सेनेकडून भाजपची ‘पंचाईत’,औरंगाबादेत काँग्रेससोबत युती

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2017 05:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close