डाॅक्टरांच्या सुरक्षेत 1 एप्रिलपासून वाढ,आंदोलन मागे घेण्याचे आदेश

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2017 05:17 PM IST

डाॅक्टरांच्या सुरक्षेत 1 एप्रिलपासून वाढ,आंदोलन मागे घेण्याचे आदेश

DOCTOR STRIKE33320 मार्च : निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी महापौर आणि निवासी डॉक्टरांमध्ये महापौरांच्या दालनात एक बैठक पार पडली. मात्र या बैठकीत काहीही तोडगा निघू शकलेला नाहीय.पण,पोलीस महासंचालकांच्या भेटीमध्ये डाॅक्टरांना सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन देण्यात आलंय. तसंच लवकर आंदोलन मागे घेतलं नाहीतर कारवाईचा इशाराही देण्यात आलाय.

आज राज्यभरातले निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर आहेत. 12 मार्चपासून सुरू असलेल्या डॉक्टरांवरच्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी आणि वाढीव सुरक्षेची मागणी करण्यासाठी डॉक्टरांची ही सामूहिक रजा आहे. पण त्यामुळे रुग्णांचे मात्र अतोनात हाल होतायेत. पण, आम्हाला जोवर प्रत्यक्षात काही दिसत नाही तोवर आम्ही काहीही ठरवणार नाही. आणि रजा टाकत राहू असं या डॉक्टरांचं म्हणणंय. त्यामुळे यावर जरी तोडगा निघाला नाही तर रुग्णांचे मात्र हाल होणार आहेत.

दरम्यान, मुंबईचे महापौर, डॉक्टर अविनाश सुपे यांनी मिळून पोलीस महासंचालकांची भेट घेतली. पोलीस महासंचालकांनी अतिरिक्त पोलीस देण्याचंही मान्य केलाय. तर अलार्म सिस्टीमही ताबडतोब सुरू करण्यात आश्वासन दिलंय. तसंच यापुढे रुग्णाला भेटण्यासाठी कमी नातेवाईक सोडण्याचे निर्णय घेण्यात आले. जर डाॅक्टरांनी आपलं रजा आंदोलन जास्त दिवस ताणून धरलं तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असा इशाराही देण्यात आलाय. सध्या शनिवारपासून ४०० पोलीस तैनात केले जातील आणि १ एप्रिलपासून ते वाढवून ७०० करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2017 05:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...