कपिलनं दिल्या 'डाॅ.गुलाटी'ला धमक्या, सुनील ग्रोवर शो सोडण्याची शक्यता

Sonali Deshpande | Updated On: Mar 20, 2017 07:36 PM IST

कपिलनं दिल्या 'डाॅ.गुलाटी'ला धमक्या, सुनील ग्रोवर शो सोडण्याची शक्यता

kapil111

20 मार्च : कपिल शर्मानं 'डाॅ. गुलाटी' आणि 'गुत्थी'ची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सुनील ग्रोवरनं दारू पिऊन शिव्या दिल्या आणि मारामारीही केली. लंडनमध्ये शो करून परत येताना विमानातच कपिलनं सुनील ग्रोवरला शिव्या द्यायला सुरुवात केली. पण आता कपिलनं यावर सावरासावरही केलीय. 'इतना तो चलता है' असं म्हणून त्यानं फेसबुकवर पोस्ट टाकलीय.

यावेळी कपिलनं जास्त दारू प्यायली होती. उलट सुनील ग्रोवरनं खूप संयम दाखवला. त्यानं विमानातल्या लोकांना लक्ष देऊ नका,म्हणून विनवलं.

या घटनेमुळे सुनील ग्रोवर दुखावला गेला. त्यानं कपिलला ट्विटरवर अनफाॅलो केलंय. असंही म्हणतात, की तो हा शो सोडायचंही म्हणतोय.इतर कलाकारांनाही कपिलचं हे वागणं पसंत नाहीय.तेही हा शो सोडू शकतात.

कपिलनं दारू पिऊन पहिल्यांदाच हंगामा केलेला नाही. याआधीही त्याच्यावर हा आरोप केला गेलाय.

कपिल म्हणतो, ' 5 वर्षात आमच्यात कधीच वाद झाले नाहीत.सुनील पाजी माझ्या मोठ्या भावासारखा आहे आणि हा वाद आमच्या कुटुंबातला आहे तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे आणि आम्ही तो सोडवू.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2017 04:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close