S M L

भगव्या वस्त्रातले योगी मुख्यमंत्री झाले,त्यात विशेष काय? - मा.गो.वैद्य

Sonali Deshpande | Updated On: Mar 20, 2017 01:28 PM IST

M G VAIDYA

प्रवीण मुधोळकर, 20 मार्च : उत्तर प्रदेशात निवडून आलेल्या आमदारांमधून एक मुख्यमंत्री होणे चांगले आहे, पण एका खासदार योगीला मुख्यमंत्री करणं यांत विशेष असं काही नसल्याचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी सांगितलं आहे. उत्तर प्रदेशात भगव्या रंगाचे वस्त्र परिधान करणारे योगी मुख्यमंत्री झाल्यामुळे त्याला कोणी आक्षेप घेण्याची गरज नाही,असंही ते म्हणाले.

'राम मंदिराचा मुद्दा हा उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आहे. त्यामुळे राम मंदिरासंदर्भात निर्णय होईल. पण शाहबानो प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल तेव्हाच्या राजीव गांधी सरकारने मुस्लीम समाजाला नाराज करणारा वाटला म्हणून कायदा करून हा आदेश निष्प्रभ ठरवला होता. याच प्रमाणे जर सुप्रीम कोर्टाने जर लवकरात लवकर राम मंदिर प्रकरणात निर्णय दिला नाही तर केंद्राने कायदा करावा,' असंही मा. गो. वैद्य म्हणाले.दरम्यान उत्तर प्रदेश सरकार राम मंदिरासंदर्भात कायदा करू शकत नाही, जास्तीत जास्त ते केंद्राला कायद्यासंदर्भात विनंती करू शकतात असंही मा. गो. वैद्य म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2017 01:28 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close