बीडमध्ये राष्ट्रवादीला ‘धस’का; झेडपीचं अध्यक्षपद भाजपकडे जाण्याची शक्यता

बीडमध्ये राष्ट्रवादीला ‘धस’का; झेडपीचं अध्यक्षपद भाजपकडे जाण्याची शक्यता

  • Share this:

MUNDE2131

20 मार्च :  बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. माजी मंत्री सुरेश धस यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या (21 मार्च) होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणूक रंगतदार होणार आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण सुरेश धस यांची समजूत काढण्यास राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना अपयश आल्याची माहिती आहे. तर पंकजा मुंडेंच्या गटाची मोठी सरशी होणार आहे.

सुरेश धस यांचे समर्थक 7 सदस्य भाजपला पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे एकूण 24 सदस्य निवडून आले आहेत. मात्र काँग्रेसचे 2 सदस्य राष्ट्रवादीला पाठिंबा देऊ शकतात. तर काँग्रेसच्या निवडून आलेल्या एकूण 3 सदस्यांपैकी 1 सदस्य भाजपच्या गळाला लागल्याची माहिती आहे.

भाजपचे एकूण 19 आणि एक भाजप पुरस्कृत असं 20 एवढं संख्याबळ आहे. आता सुरेश धस यांच्या गटानं भाजपला मतदान करण्याचा निर्णय घेतल्याने,  जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपकडे येण्याचा मार्ग सुकर झाला .

सुरेश धस यांचे 7, काँग्रेस 1 आणि शिवसंग्रामच्या चार सदस्यांचाही भाजपला पाठिंबा असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 32 च्या आसपास असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यात पाठिंब्याबाबत सकारात्मक चर्चा घडवून आणली होती, असं बोललं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 20, 2017, 12:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading