लवकरच आयडिया आणि वोडाफोनच होणार विलीनीकरण

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2017 02:55 PM IST

लवकरच आयडिया आणि वोडाफोनच होणार विलीनीकरण

voda_idea_revised20 मार्च :  देशातल्या 2 मोठ्या टेलिकॉम कंपन्या, व्होडाफोन इंडिया आणि आयडिया या सेल्युलर कंपन्यांचे लवकरच विलिनीकरण होणार आहे. दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळानं याला मंजुरी दिली आहे. या विलिनीकरणानंतर स्थापन झालेली नवीन कंपनी ही देशातली सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असेल.

आयडीया कंपनीच्या संचालक मंडळाने ही घोषणा केली आहे. या विलिनीकरणानंतर स्थापन होणाऱ्या कंपनीत तब्बल 40 कोटी ग्राहक असणार आहेत. नवीन स्थापन होणाऱ्या कंपनीत वोडाफोनची 45.1 टक्के भागीदारी असेल तर आयडीयाची 26 टक्के भागीदारी असणार आहे. उर्वरित 35 टक्के बाजारतले इतर भागीदार असतील. आधी जरी व्होडाफोन इंडियाचा वाटा जास्त असले तरी काही महिन्यांनी आयडिया व्होडाफोनकडून शेअर्स विकत घेईल. त्यामुळे कालांतरानं आयडियाकडेही समान शेअर्स येतील.

रिलायंस जिओला टक्कर देण्यासाठी मोबाईल क्षेत्रातल्या या मोठ्या कंपन्या एकवटल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी वोडाफोनने आपल्या फोरजी इंटरनेट सेवा आणि कॉलिंगच्या दरात मोठी कपात केली होती. यानंतर या दोन कंपन्यांनी हा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2017 11:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...