वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ राज्यभरात डॉक्टरांचं काम बंद

वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ राज्यभरात डॉक्टरांचं काम बंद

  • Share this:

DOCTOR STRIKE

20 मार्च :  धुळे आणि मुंबईत रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याच्या घटना ताज्या असतानाच आता औरंगाबादमध्येही अशी घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबादेतील घाटी या शासकीय रूग्णालयातील डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी रुग्णसेवा बंद केली आहे. डॉक्टरांवरील या वाढत्या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून राज्यभरातले निवासी डाॅक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे. या  आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा जरी सुरू असल्या तरी रुग्णसेवेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

घाटीतील निवासी डॉक्टरांनी मारहाणीच्या निषेधार्थ रूग्णालयासमोर शांततेत आंदोलन केलं. रात्री उशिरा एका रूग्णाचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्याला पाहण्यासाठी नातेवाईकांनी डॉक्टरांशी हुज्जत घातली आणि त्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे.

दरम्यान, मुंबईतील सायन रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली असून मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी सामूहिक काम बंद आंदोलन पुकारलं आहे.

धुळ्यापाठोपाठ मुंबईत डॉक्टरांवर हात उचलल्याच्या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. सायन हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली. या घटनेच्या विरोधात निवासी डॉक्टर रविवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून सामूहिक रजेवर गेले आहेत. तसंच नायर हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल आणि केईएम हॉस्पिटलमधील रुटीन सेवा बंद करण्यात आल्या आहेत, तर अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. डॉक्टर मारहाण प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सायन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2017 08:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading