S M L

शेतकरी कर्जमाफीचं बोलून दाखवताना लाज नाही वाटत? - राजू शेट्टी

Sonali Deshpande | Updated On: Mar 19, 2017 07:19 PM IST

शेतकरी कर्जमाफीचं बोलून दाखवताना लाज नाही वाटत? - राजू शेट्टी

19 मार्च : कधीतरी शेतकरी कर्जमाफीसाठी बावन्न हजार कोटी दिले तर सारखं विचारून काढता आणि कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी लाख कोटी रुपये देता, असा सवाल राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना उपस्थित केलाय. यवतमाळमध्ये झालेल्या पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या स्मृतिप्रीत्यर्थ यवतमाळमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात राजू शेट्टींनी सरकारवर हल्लाबोल केला.

सरकार शेतकरी कर्जमाफी देताना सारखं विचारून काढतं पण कर्मचाऱ्यांना वेतन आयोगापोटी लाखभर कोटी रुपये देताना सरकारला लाज वाटत नाही का, असा सवालही राजू शेट्टींनी उपस्थित केला. आज आम्ही अन्नत्याग केलाय, पण जर वर्षभर शेतीत्याग केला तर सव्वाशे कोटी जनता उपाशी मरेल असा टोलाही त्यांनी लगावला.राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शेतकरी संघटनाही शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक आहे. पुण्यात शेतकरी कर्जमाफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती. यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. शिवाय सरकारविरोधातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

राज्यातल्या पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या निषेधार्थ आज यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगव्हाण गावात एक दिवसाचं चूलबंद आणि अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं. याच गावातल्या साहेबराव करपे या शेतकऱ्यानं 19 मार्च 1986 साली सामूहिक आत्महत्या केली होती. ही राज्यातली पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी चिलगव्हाण गावात हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. गावकऱ्यांनीही मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभाग नोंदवला.

नागपूरातही जनमंच संस्थेच्या वतीने अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं.त्याचप्रमाणे पुण्यातही अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं. तर विदर्भात बुलडाण्यामध्येही  शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अन्नत्याग आंदोलन केलं. शेकडो शेतकऱ्यांनी अन्नत्याग करत करपे कुटुंबियांना श्रद्धांजली वाहिली..

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2017 07:19 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close