S M L

अमेरिकेतील प्रसिद्ध गिटारवादक चक बेरी यांचं निधन

Sonali Deshpande | Updated On: Mar 19, 2017 03:14 PM IST

अमेरिकेतील प्रसिद्ध गिटारवादक चक बेरी यांचं निधन

19 मार्च : अमेरिकेतील प्रसिद्ध गिटारवादक चक बेरी यांचं निधन झालंय. ते 90 वर्षांचे होते. गायक आणि प्रसिद्ध गिटारवादक म्हणून चक बेरी यांची ओळख होती. त्यांनी सात दशकांच्या करिअरमध्ये अनेक हिट गाणी गायली आहेत. त्यामध्ये रोल ओव्हर बिथोवन आणि जॉन बी गुड अशा अनेक गाण्याचा यामध्ये समावेश आहे.

1955 मध्ये त्यांचं मेबेलिन हे पहिलं गाणं रिलीज झालं होतं. या गाण्याला सुद्धा सर्वाधिक जास्त पसंती मिळाली होती.चक बेरी यांना 1984 साली संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जाणाऱ्या ग्रॅमी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.याचबरोबर संगीत क्षेत्रातील विविध पुरस्कार त्यांना देण्यात आले आहेत. त्यांच्या जन्म मिसौरीमधील सेंट लुईमध्ये 1926 मध्ये झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2017 01:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close