अर्थसंकल्पात बळीराजाच्या वाट्याला काय आलं ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 18, 2017 06:42 PM IST

अर्थसंकल्पात बळीराजाच्या वाट्याला काय आलं ?

budget_farmer18 मार्च :  राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. कर्जमाफीची घोषणा टाळून मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्यात. मागेल त्याला शेततळं या योजनेसाठी 225 कोटींची तरतूद करण्यात आलीये. राज्याच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेसाठी 1200 कोटींची भरीव तरतूद केलीये.  नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी कर्ज थकवू नये आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ होईल अशी योजना आणण्याची घोषणाही मुनगंटीवार यांनी केली. तसंच  सिंधुदुर्गात खेकडा उपज केंद्र उभारण्यासाठी 9 कोटी 31 लाखांची तरतूद करण्यात आलीये.

कृषी क्षेत्रासाठीची तरतूद

- जलसंपदा विभागासाठी 8 हजार 233 कोटींची तरतूद

-  जलयुक्त शिवारासाठी आतापर्यंत 1600 कोटी दिले, पुढील वर्षासाठी 1200 कोटींची तरतूद

- जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दरवर्षी 5 हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचं ध्येय

Loading...

- मराठवाड्यातील कृष्णा खोरे पाणी प्रकल्प येत्या 4 वर्षात पूर्ण करणार  

- पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी 125 कोटींची तरतूद

- कृषी पंप जोडणीसाठी 979 कोटींची तरतूद

- अॅग्रो मार्केटसाठी 50 कोटींची तरतूद         

- कृषी पंप जोडणीसाठी 979 कोटींची

 - वीज जोडणीसाठी 981 कोटी रुपयांची तरतूद

- कृषी क्षेत्रातील उत्पन्न 2021 पर्यंत दुप्पट करणार

- मराठवाड्यातील 4000 गावात, विदर्भातील 100 गावात शेतीला संरक्षण देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प

- नियमित कर्ज भरणा-या शेतकऱ्यांनी कर्ज थकवू नये, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ होईल अशी योजना आणणार

-  खेकडा उपज केंद्र सिंधुदुर्गात उभारण्यासाठी 9 कोटी 31 लाखांची तरतुद

- मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागासाठी 25 कोटींची तरतुद

- कोळंबी बीज उत्पादन योजना मोठया प्रमाणात राबवण्याचा निर्णय

- मागेल त्याला शेततळे योजनेसाठी 225 कोटींची तरतूद

- मराठवाड्याला पाणी पुरवठ्यासाठी 15 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 18, 2017 06:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...