18 मार्च : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला. मात्र, या अंर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा वगळता घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे.
विरोधकांच्या प्रचंड गदारोळात मुनगंटीवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणास सुरूवात केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांकडून सभागृहात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. त्याचबरोबर, कृषी क्षेत्रासाठीही भरघोस तरतूदी दिल्या आहेत. सिंचनासाठी 2 हजार कोटी तर जलयुक्त शिवार योजनेसाठी बाराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेततळ्यांसाठी 200 कोटी रुपये बाजूला ठेवण्यात आलेत. गेल्या आर्थिक वर्षात जलसंपदा खात्याचा 100 टक्के निधी खर्च झाला, अशी घोषणा मुनगंटीवारांनी केली.
त्यासोबतच, मुंबई आणि नागपूर मेट्रोसाठी सातशे कोटी तर स्मार्ट सिटी योजनेसाठी सोळाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा