शिवसेना बॅकफुटवर, अर्थसंकल्प मांडू देणार

  • Share this:

Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis during a press conference with Shiv Sena leaders Subhas Desai and Divakar Ravate in Mumbai, on Dec 4, 2014. (Photo: Sandeep Mahankal/IANS)

शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका दर्शवली असल्याचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलं. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेली शिवसेना बॅकफूटवर गेली. सरकारला अर्थसंकल्प मांडू देऊ, विधानसभेत शांत बसून अर्थसंकल्प ऐकणार अशी भूमिका शिवसेना आमदारांनी घेतली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर सभागृहाचे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.

राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प आज दुपारी विधीमंडळात सादर केला जाणार आहे. मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जावी या मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

पण या दरम्यान शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर अर्थसंकल्प मांडू देण्याची भूमिका शिवसेना आमदारांनी घेतली. कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत, असे शिवसेना नेते जरी सांगत असले तरी शिवसेनेचं मन वळवण्यात भाजपला यश आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 18, 2017, 1:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading