शिवसेनेचे वाघ शांत कसे झाले - धनंजय मुंडे

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 18, 2017 01:56 PM IST

dhanajay munddsae

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधिमंडळ अधिवेशनात सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधकांनी आता शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कालपर्यंत अर्थसंकल्प सादर करून देणार नाही, असे म्हणणारे शिवसेनेचे वाघ शांत कसे झाले, असा खोचक सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत केला.

Loading...

कर्जमाफीच्या मुद्द्यावर काल (शुक्रवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना मंत्र्यांचे शिष्टमंडळ दिल्लीत गेले होते. कर्जमाफीबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत या भेटीबाबत निवेदन केलं. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर आपण सभागृहात बसून शांतपणे अर्थसंकल्प ऐकणार असल्याची भूमिका शिवसेनेने घेतली.

यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले.शेतकरी कर्जमाफीबाबत शिवसेनेचे दुटप्पी धोरण आहे. अर्थसंकल्प मांडू देणार नाही असे कालपर्यंत म्हणणारे शिवसेनेचे वाघ शांत कसे झाले, असा सवाल मुंडे यांनी केला आहे.

त्याचबरोबर, मुख्यमंत्र्यांच्या निवेदनामुळेच हताश होऊन औरंगाबादेतील विष्णू बुरकुलची आत्महत्या केली आहे. या आत्महत्येला सरकार जबाबदार असून सरकारविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मुंडे यांनी केली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 18, 2017 01:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...