कर्जमाफीबाबत केंद्र सरकार सकारात्मक - मुख्यमंत्री

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 18, 2017 01:21 PM IST

कर्जमाफीबाबत केंद्र सरकार सकारात्मक - मुख्यमंत्री

sdsadfy

18 मार्च :शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याची सरकारची तयारी आहे, केंद्र सरकार कर्जमाफीच्या मुद्यावर सकारात्मक दृष्टीने विचार करत असून याबाबत केंद्रीय अर्थमंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी सकारात्क चर्चाही झाली आहे. त्यामुळे विरोधकांनी सध्या सहकार्य करावं, असे निर्णय एका दिवसात होत नाहीत, जरा सबुरीने घ्या, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला.

राज्यात 1 कोटी 35 लाख शेतकरी आहेत, यांपैकी 31 लाख शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांना नवीन कर्ज देता येणार नाही. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. केवळ घोषणा देऊन शेतकऱयांचे कैवारी होता येत नाही, त्यामुळे विरोधकांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजकारण करु नये, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

 दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी आवश्यक तरतूदी करण्यात येतील, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 18, 2017 01:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...