18 मार्च : राज्याचा आर्थसंकल्प आज सादर होणार असून यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न चांगलाच पेटलेला पहायला मिळत आहे. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आक्रमक भूमिका घेतल्याने विधानसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकुब करण्यात आलं होतं.
विरोधकांनी पुन्हा एकदा विधानसभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. मंत्री आणि आमदार विधानभवनात प्रवेश करत असताना काँग्रेस - राष्ट्रवादीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. हात हलवत आले… दिल्ली वरून आले.. हात हलवत आले.. नागपूरचा पोपट काय म्हणतो... कर्जमाफी नाय म्हणतो... अशा घोषणा देत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. तर शिवसेनेच्या मंत्र्यांना बघून… काढले…काढले.. येड्यात काढले..., अशा घोषणा विरोधकांनी यावेळी दिल्या.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा