18 मार्च : कर्जमाफीसाठी सर्वसमावेशक अशी देशव्यापी योजना तयार करण्याचे केंद्र सरकारचे आश्वासन म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. त्याचबरोबर, जर आज कर्जमाफीची घोषणा नाही झाली तर ते शिवसेना सरकार मधून आज बाहेर पडेल का असा सवाल विखे पाटील यांनी केला आहे.
विधिमंडळात आज (शनिवारी) राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प मांडण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे. मात्र, अर्थसंकल्पात तशी कोणताही तरतूद असणार नाही, याचे संकेत शुक्रवारी राज्य सरकारकडून देण्यात आले होते. या मुद्द्यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना आणि भाजप यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ दिल्लीला जाणं, हे केवळ एक नाटक होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शिष्टमंडळाची साधी भेटदेखील घेतली नाही. तर अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अवघ्या 20 मिनिटांत या शिष्टमंडळासोबतची बैठक आटोपती घेतली. शिवसेना या नाटकातीलच पात्र होते, असं विखे यांनी म्हटलं आहे. तसंच केंद्र सरकारचा सर्व राज्यांसाठी सर्वसमावेशक योजना बनवण्याचा निर्णय शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. हे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, अशी टीका त्यांनी केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा