S M L

कार रेसर अश्विन सुंदरचा चेन्नईत अपघाती मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Mar 18, 2017 11:09 AM IST

कार रेसर अश्विन सुंदरचा चेन्नईत अपघाती मृत्यू

18 मार्च :  भारताचा लोकप्रिय कार रेसर अश्विन सुंदर याचा आज कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. कार एका झाडाला आदळल्यानं झालेल्या अपघातात अश्विन आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला.

अश्विन आणि त्याची पत्नी निवेदिता बीएमडब्ल्यू कार ने प्रवास करत होते. चेन्नईच्या संथोम हायवेवर एका झाडाला कार आदळली. त्यामुळे कारने पेट घेतला. अश्विनला दरवाजा उघडता न आल्याने त्याचा आणि त्याचा पत्नीचा मृत्यू झाला. पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहचून कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दीड तासाच्या प्रयत्नानंतरही दरवाजा न उघडता आल्यानं अखेर कारची वरचा भाग कापून या दोघांचे मृतदेह काढावे लागले.


निवेदिता या चेन्नईतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होती. हे दोघेही पोरुर जवळील अलपक्कम येथे राहतात. ते एमआरसी नगरच्या राजा अण्णामलाईपूरम येथे मित्राच्या घरी गेले होते. तिथून घराकडे परतताना आज सकाळी हा अपघात झाला.

दरम्यान, कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचीही माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 18, 2017 11:09 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close