विधिमंडळात आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार

विधिमंडळात आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार

  • Share this:

MAHA BUDGET 2017

18 मार्च : राज्याचा अर्थसंकल्प आज (18 मार्च) सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र कर्जमाफीची मागणी आणि सभागृहात होणाऱ्या गोंधळाचं या अर्थसंकल्पावर सावट असल्याने आज नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे.

याच पार्श्वभूमीवर काल (17 मार्च) रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कॅबिनेटच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. आज मुख्यमंत्री सभागृहात याबाबत निवेदन करतील.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत दुपारी 2 वाजता अर्थसंकल्पाचं वाचन सुरु करतील. तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर विधान परिषदेत अर्थसंकल्पाचं वाचन करतील.

मात्र अर्थसंकल्प जरी मंजूर केला तरी आम्ही कर्जमुक्तीच्या मुद्यावर ठाम असल्याचं शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी सांगितल. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुन आक्रमक झालेले विरोधक आणि शिवसेना आज सभागृहात काय भूमिका मांडणार, हे पाहण महत्वाचं असणार आहे.

यंदा महसुली तूट सुमारे ३६४५ कोटी आणि वित्तीय तूट ३५ हजार कोटी रुपये असून नोटाबंदीच्या फटक्यामुळे अपेक्षित उत्पन्नात घट आली आहे. तर पुढील आर्थिक वर्षांत जुलैपासून जीएसटी लागू होण्याची चिन्हे असल्याने त्याचेही आव्हान पेलावे लागणार आहे. नवीन योजनांच्या घोषणा करण्यापेक्षा चालू योजनांवर पुरेसा खर्च करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल 2016 - 17

- राज्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ

- अन्नधान्य उत्पादनात विक्रमी वाढ

- तृणधान्य 80 टक्के, कडधान्य 187 टक्के, तेलबिया 142 टक्के, कापूस 83 टक्के वाढ अपेक्षित

- रब्बी हंगामातील उत्पादनातही भरघोस वाढ अपेक्षित

- उसाच्या उत्पादनात 28 टक्के घट अपेक्षित

- 2016 मध्ये महसुली उत्पन्नात 11.4 टक्क्यांची वाढ

- 2016 - 17 मध्ये राज्याच्या स्थूल उत्पन्नात 9.4 टक्के वाढ अपेक्षित

-  2016 - 17 मध्ये राज्याची अपेक्षित वित्तीय तूट 35,031 कोटी

- राज्यावर सध्या 3 लाख 56 हजार 223 कोटी कर्ज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 18, 2017, 9:24 AM IST

ताज्या बातम्या