मुंबई पालिकेत 'पहारेकरी' भाजपकडे 9 समित्या !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 17, 2017 11:49 PM IST

मुंबई पालिकेत 'पहारेकरी' भाजपकडे 9 समित्या !

प्रणाली कापसे,मुंबई

17 मार्च : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समित्यांसाठी सेना-भाजपनं युती केलीय. प्रभाग समित्यांमध्ये ५०-५० टक्के सत्तेचे वाटप करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे सत्तेत सहभागी न होता, केवळ पहारेकरी म्हणून काम करू असं सांगणाऱ्या भाजपनं प्रभाग समित्यांपैकी ९ प्रभाग समित्या पटकावल्या आहेत.

bmc_story43मुंबई महापालिकेच्या महासभा आणि स्थायी समितीचा आज पहिला दिवस होता. पण पहिल्याच दिवशी सेना-भाजपच्या महापालिकेतल्या यापुढे होणाऱ्या कामकाजाची चुणूक दाखवणारा हा दिवस होता. एकीकडे प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी सेना-भाजपने युती करत एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याचं सिद्ध केलं आहे. त्यातही अडचणीच्या ठरणाऱ्या एका समितीवर ३ वर्ष भाजप आणि २ वर्ष सेना असा तोडगा काढण्यात आलाय.

एक नजर टाकूयात मुंबई महापालिकेच्या प्रभाग समित्यांवर...

- मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग  समित्या आहेत.

Loading...

- त्यात सेनेला ५ आणि भाजपला ७ जागांवर प्रभाग समित्या मिळवणं शक्य होतं

- पण उर्वरित ५ समित्यांवर मात्र इतरांची वर्णी लागण्याची शक्यता होती.

- पण सेना-भाजपच्या एकत्र येण्यामुळे आता एक वगळता सर्व समित्यांवर सेना-भाजपचे अध्यक्ष असतील

- त्यातील ए बी सी डी या वॉर्डच्या समितीमध्ये तीन वर्ष भाजप तर दोन वर्ष सेना अशी मध्यस्थी झाली आहे

- त्यामुळे सुरूवातीला भाजपकडे ९ आणि सेनेकडे ७ प्रभाग समित्या असतील

मुंबई महापालिकेत संपूर्ण शहरासाठी करावयाच्या बाबी या स्थायी समिती, सभागृह स्तरावर होतात. पण नगरसेवकांना मिळणारा निधी मात्र प्रभाग समित्यांमार्फत वापरावा लागतो. अशावेळी प्रभाग समित्या हातातून गमावून भाजपचे नगरसेवक लोकांकरिता काम करु शकले नसते किंवा सेनेनं मनात आणलं तर भाजपची कामं रोखून धरता आली असती. जे होऊ नये म्हणून दोन्ही पक्षांनी मध्यम मार्ग स्वीकारला.

कारण कुठलंही असो सेना-भाजप महापालिकेच्या सारीपाटात एकमेकांच्या विरोधात आणि एकमेकांच्या मदतीला जाऊन काँग्रेसमुक्त महापालिका करणार असं चित्र दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2017 11:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...