S M L

दिल्लीवारीत सेनेला काय मिळालं ?

Sachin Salve | Updated On: Mar 17, 2017 11:37 PM IST

दिल्लीवारीत सेनेला काय मिळालं ?

17 मार्च : उद्याच्या अर्थसंकल्पात शिवसेनेनं कुठलंही विघ्न आणू नये, यासाठी कर्जमाफीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री स्वतः युतीच्या मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ थेट दिल्लीला घेऊन गेले होते.पण यातून मिळालं काय तर फक्त आश्वासन....म्हणूनच मग शिवसेना मंत्र्यांनीही अर्थसंकल्पावेळी नेमकी काय भूमिका घ्यायची याचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील असं सांगून पक्षांची भूमिका अजूनही संदिग्धच ठेवलीय.

कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेनेची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री हातातली सगळी कामं बाजूला ठेऊन थेट दिल्लीला गेले. तिथं त्यांनी सेना मंत्र्यांच्या शिष्टमंडळासमवेत केंद्रीय अर्थमंत्री आणि कृषीमंत्र्यांची भेटही घेतली. पण या दिल्लीवारीतून मिळालं कायतर फक्त कर्जमाफीचं सकारात्मक आश्वासन...

या दिल्लीवारीने शिवसेनेचं खरंच समाधान झालं का ?, असं रामदास कदमांना विचारताच त्यांनी सरळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे उंगली निर्देश करून हात वार केले..

रामदास कदमांच्या उत्तराने शिवसेनेचं कर्जमाफीच्या मुद्यावर खरंच समाधान झालंय हे आता अर्थसंकल्पावेळी सेना नेमकी काय भूमिका घेते यावरूनच स्पष्ट होईलच. पण विरोधक मात्र, कर्जमाफीच्या मागणीवर अजूनही ठाम आहेत. कर्जमाफीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ही अशी धूमचक्री सुरू असतानाच तिकडे औरंगाबादमध्ये आणखी एका तरुण शेतकऱ्यांनं आत्महत्या केलीय. एकूणच कायतर राजकीय अनास्थेपोटी राज्यातल्या शेतकरी आत्महत्या काही केल्या थांबायला तयार नाहीयेत. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांकडे कर्जमाफीनंतर आत्महत्या थांबण्याची हमी मागत बसण्याऐवजी थेट शेतीमालालाच पुरेसा हमीभाव दिला तर शेतकऱ्याचं जीवनमान नक्कीच उंचावेल आणि तो आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2017 11:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close