उद्धव ठाकरेंच्या हस्ते पेंग्विन प्रकल्पाचं उद्घाटन, भाजपला निमंत्रणच नव्हतं !

उद्धव ठाकरेंच्या हस्ते पेंग्विन प्रकल्पाचं उद्घाटन, भाजपला निमंत्रणच नव्हतं !

  • Share this:

Penguine-317 मार्च : मुंबईतला बहुप्रतिक्षीत हम्बोल्ट पेंग्विन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलंय. उद्यापासून हा प्रकल्प सर्वसामान्यासाठी खुला होणार आहे.

३१ मार्च पर्यंत मुंबईकरांना हा प्रकल्प मोफत पाहता येणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी आयुक्तांनी मुंबई शहरात चांगल्या दर्जाचे मनोरंजन करणाऱ्या गोष्टी उपलब्ध करुन देण्यावर भर दिला. शिवाय जिजामाता उद्यानात लवकरच नवे १८ पिंजरे आणि विविध प्राणी आणले जातील असंही ते म्हणाले. दरम्यान या कार्यक्रमासाठी भाजपच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. निवडणुकीच्या काळात भाजपकडून पेंग्विनचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जात होता. आज या उद्घाटनाच्या प्रसंगी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपला यावरून टोलाही लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2017 11:32 PM IST

ताज्या बातम्या