17 मार्च : राज्याच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी रणकंदन सुरू आहे. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. औरंगाबादमध्ये एका तरूण शेतकऱ्यानं गळफास घेऊन जिवन यात्रा संपवलीये.
गेल्या तीन महिन्यात जवळपास दीडशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय. औरंगाबादमध्ये आज विष्णू बुरकुले या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. विष्णूवर महेंद्र फायनान्सचे दीड लाखांचे कर्ज होते. पण वेळीत कर्ज न फेडल्यामुळे दीड लाखाचं कर्ज व्याजामुळे पाच लाखावर गेलं. कर्ज फेडलं नसल्यामुळे महेंद्र फायनान्सने त्याच्या घराला ठाळे ठोकले. कर्जामुळे विष्णूचा संसार उघड्यावर पडला. या सगळ्या विवचनेतून विष्णूने आत्महत्याचा मार्ग पत्कारला. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही अशी हमी मागणारे मुख्यमंत्री फडणवीस आता तरी कर्जमाफीचा विचार करतील का ? असा सवाल विचारला जात आहे.
विष्णूनं आत्महत्या का केली ?
- विष्णूवर महेंद्र फायनान्सचे दीड लाखांचे कर्ज
- दीड लाखाचे कर्ज व्याजामुळं पाच लाखावर गेले
- कर्ज फेडीसाठी महेंद्र फायनान्सने घराला ठोकले टाळे
- कर्जामुळे संसार उघड्यावर पडला
- विष्णूवर सेंट्रल बँकेचं 79 हजार रुपये कर्ज
- खाजगी सावकाराचाही कर्जाचा 50 हजाराचा फास
- विष्णूने कर्ज घेऊन विहीर खोदली, मात्र आता विहीर कोरडीच
- विष्णूकडं केवळ चौदा गुंठे शेती होती
- कर्ज फेडीसाठी सहा गुंठे शेती विकली
- विष्णूला आठ गुंठे शेतात दोन क्विंटल गव्हाचं उत्पन्न
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा