कर्जमाफीसाठी अर्थमंत्री सकारात्मक -मुख्यमंत्री

कर्जमाफीसाठी अर्थमंत्री सकारात्मक -मुख्यमंत्री

  • Share this:

cm_dlehi_meeting

17 मार्च : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळासह अर्थमंत्री अरूण जेटली यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर अर्थमंत्री अरूण जेटली कर्जमाफीसाठी सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

केंद्राने राज्याला मदत देऊ केल्यास राज्यही त्यातील मोठा वाटा उचलेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांना दिलंय. त्यामुळे लवकरात लवकर केंद्रानं कर्जमाफीसाठी योजना तयार करावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केलीय.

कर्जमाफी न दिल्यास 31 लाख शेतकरी प्रवाहाबाहेर जाण्याची भीती असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान या चर्चेनं शिवसेनेचं समाधान झालंय अथवा नाही याबाबत काहीही बोलायला शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नकार दिला. याबाबत उद्धव ठाकरेंना चर्चेचा तपशील सांगू त्यानंतरच शिवसेनेची भूमिका स्पष्ट करू असं रामदास कदम यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 17, 2017, 7:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading