बीएमसीत शिवसेना-भाजपची प्रभाग समितीत 'पारदर्शक' युती

बीएमसीत शिवसेना-भाजपची प्रभाग समितीत 'पारदर्शक' युती

  • Share this:

sena_bmc_yuti18 मार्च : सध्या शेतकरी कर्जमाफीवरुन एकमेकांच्या विरोधात उभे असलेले शिवसेना आणि भाजप पक्षाचे मुंबई महापालिकेतील शिलेदार प्रभाग समितीतील अध्यक्ष पदासाठी एकत्र आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मूक संमतीनंतर न होणारी मित्रांमधील युती मुंबई महापालिकेत अखेर अस्तित्वात आली आहे.

मुंबई महापालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती, बेस्ट समितीसह कोणत्याही प्रभाग समितीची निवडणूक लढवणार नाही अशी भीमगर्जना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा दिवसांपूर्वी केली होती. मात्र प्रभाग समितीतील समन्यय आवश्यक असून त्यासाठी शिवसेना आणि भाजप युती होणे आवश्यक असल्याचे दोन्ही पक्षातील पालिकेतील नेत्यांनी आपापल्या पक्ष प्रामुखाना सांगितल्या. त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर या घडामोडी घालन्यात आल्या.

मुंबई महापालिकेतील तुटलेली युती भविष्यात व्हावी यासाठी पडद्यामागून शिवसेनेचे पालिकेतील सभागृहनेते यशवंत जाधव आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी तर भाजपकडून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि गटनेते मनोज कोटक यांनी युती करण्यासाठी हालचाली केल्या. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मूक समतीनंतर भाजपने प्रभाग समितीत शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला.

या नव्या फॉर्म्युल्यानुसार ५०-५० चा फॉर्म्युला निश्चित केला. त्यात १७ प्रभाग समितींपैकी ९ प्रभाग समिती भाजपाकडे तर ८ प्रभाग समितीवर शिवसेनेचा अध्यक्ष असेल. दादर, परळ, लालबाग, दहिसर या परिसरात शिवसेनेचे प्राबल्य आहे. तर विलेपार्ले, गोरेगाव, अंधेरी आणि मुलुंड भागात भाजपकडे बहुमत आहे.

शिवसेना आणि भाजपमध्ये मुंबई महापालिकेमध्ये समन्वय असावा यासाठी ही युती झाल्याचं सांगण्यात येत असले तरी भाजपच्या नगरसेवकांकडून पक्षाच्या पालिकेतील नेत्यांवर दबाव वाढत होता. त्याचाच भाग म्हणून यशवंत जाधव, मिलिंद नार्वेकर, आशिष शेलार आणि मनोज कोटक यांची बैठक होऊन त्यामध्ये ज्यांचे संख्याबळ जास्त ती समिती त्या पक्षाला देण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रभाग समितीमध्ये ५ लाख पेक्षा रक्कमेची कामे मंजूर केली जातात. वॉर्ड पातळीवर ही कामे करून घेण्यासाठी तांत्रिक समस्या निर्माण होऊ नये म्हणून दोन्ही पक्षातील नेत्यांनी या युतीवर शिक्का मोर्तब केल्याचे समजते. त्यामुळे आम्ही केवळ पारदर्शकतेचा पहारेकरी असे म्हणणाऱ्या भाजपाला शिवसेनेसोबत युती करण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये शेतकरी कर्जमाफीवरुन संबंध ताणले गेले आहेत. प्रभाग समितीतील युतीवरुन तरी संबंध सुधारतील या आशेपोटीच ही युती केल्याचं नेते सांगतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 17, 2017, 6:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading