हमी देणार का ? सोशल मीडियानं मुख्यमंत्र्यांवर केलाय प्रश्नांचा भडीमार

हमी देणार का ? सोशल मीडियानं मुख्यमंत्र्यांवर केलाय प्रश्नांचा भडीमार

  • Share this:

cm 1

17 मार्च : सध्या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी चांगलीच गाजतेय. शिवसेना आणि विरोधकांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन केलं.कर्जमाफी दिली तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची हमी देणार का असा सवाल काल मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्याविरोधात रान उठलंय. पाहुयात नेमके काय सवाल मुख्यमंत्र्यांना केले जातायत ते-

मुख्यमंत्रीसाहेब नोटबंदी केली, आता भ्रष्टाचार कमी

होण्याची हमी देणार का?

स्वच्छ कारभारासाठी मतं दिली, मग कारभार

पारदर्शी करणार का?

यावर्षी दुष्काळ पडणार नाही, गारपीठ होणार

नाही याची हमी मुख्यमंत्री देणार का?

शेतकऱ्यांच्या मालाला जो हमीभाव देऊ केलाय

तो मिळेल याची तरी हमी देणार का?

शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव सरकार पाडणार

नाही याची हमी देणार का मुख्यमंत्री?

24 तास शेतीला वीज देणार, लोडशेडिंगमुक्त

गावं करणार याची हमी देणार का?

यावर्षी दर्जेदार आणि निर्भेळ बि-बियाणे तसेच

खतं उपलब्ध होतील याची हमी देतील का?

मातीमोल भावानं शेतीमाल विकला जाणार

नाही याची हमी देणार का?

यावर्षी खाजगी सावकार तगादा लावणार नाहीत

याची हमी देणार का?

सोशल मीडियावर अशा प्रश्नांनी जोर धरलाय. तर दुसरीकडे विरोधक कर्जमाफीवरून आजही आक्रमक होते. विधान भवनाच्या पायऱ्यांवर आजही काँग्रेसनं आंदोलन केलं.

त्याआधी आयबीएन लोकमतशी बोलताना पृथ्वीराज चव्हाणांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली. कर्जमाफीचा निर्णय घेता येत नसेल, तर खुर्ची सोडा, या शब्दात चव्हाणांनी ताशेरे ओढले. शेतकऱ्यांवर जुगार खेळल्यामुळे कर्ज झालेलं नाही.बँकांना फायदा होऊ द्यायचा नाही, या म्हणण्याला काय अर्थ आहे, असा सवालही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 17, 2017, 6:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading