शेवपुरीतून विष देऊन पतीने केली पत्नीची हत्या

शेवपुरीतून विष देऊन पतीने केली पत्नीची हत्या

  • Share this:

nagpur_news3317 मार्च : सोशल मीडियावर आणि फोनवर व्यस्त राहणाऱ्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने शेवपुरीतून विष देऊन पत्नीची हत्या केल्याची घटना नागपूरात उघडकीस आली आहे. रेखा राधेश्याम तिवारी असं ४० वर्षे वयाच्या मृत महिलेचे नाव असून ती शिकवणी घेण्याचे काम करत होती.

रेखा तिवारी यांचा १ जानेवारीला शेवपुरी खाल्ल्यामुळे प्रकृत्ती खालावल्यामुळे मृत्यू झाला होता. या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली होती. पण आपल्या आजीकडे राहणाऱ्या रेखा यांच्या तेरा वर्षीय मुलीने आपल्या वडिलांनीच शेवपुरीमधून विष देऊन आपल्या आईचा खून केल्याची माहिती दिल्याने या प्रकरणाचा खुलासा झाला. या प्रकरणात आरोपी राधेश्याम तिवारी याला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 17, 2017, 5:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading