आर्थिक पाहणी अहवाल : वर्षभरात सिंचन क्षेत्रात फक्त पाऊण टक्का वाढ

आर्थिक पाहणी अहवाल : वर्षभरात सिंचन क्षेत्रात फक्त पाऊण टक्का वाढ

  • Share this:

irriagation_555प्रफुल्ल साळुंखे, मुंबई

17 मार्च : राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात राज्यावर कर्जाचा डोंगर आहेच. पण हाती पोसणाऱ्या सिंचन प्रकल्पातही राज्य सरकार भरीव अशी कोणतीही कामगिरी करू शकला नाही.राज्य सरकारने सिंचनाच्या क्षेत्रात प्रगती केल्याचा दावा केला असला तरी गेल्या वर्षभरात केवळ पाऊण टक्का सिंचन क्षेत्र वाढलं असल्याचं आर्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट झालं आहे.

2014- 15 मध्ये जे निर्मित सिंचन क्षमता होती ती 48 लाख 66 हजार हेक्टर होती. ती यावर्षी 49.10 लाख हेक्टर एवढी झाली आहे. म्हणजेच केवळ पाऊण टक्का सिंचन क्षमता वाढली आहे. यावर्षी राज्यात पाऊसाने चांगली साथ दिली. राज्यातील धरणातील जल साठा 44 टक्क्यांवर होता. हे पाहता राज्यात यावर्षी प्रत्यक्ष सिंचन क्षेत्रात वाढ होण अपेक्षित होत मात्र यावेळी प्रत्यक्ष सिंचित क्षेत्रात कमालीची घट झाली आहे.

2014 मध्ये दुष्काळी परिस्थिती असताना 31.37 लाख हेक्टर क्षेत्रात सिंचन झालं होतं. पण यंदा 24.47 लाख हेक्टर क्षेत्रात सिंचन झालं आहे. गेल्या 6 वर्षात सर्वात नीचांकी सिंचन क्षेत्र यावर्षी राहीलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2017 05:06 PM IST

ताज्या बातम्या