राज्यावर 3,56,223 कोटींचा कर्जाचा डोंगर,महसूलही घटला

राज्यावर 3,56,223 कोटींचा कर्जाचा डोंगर,महसूलही घटला

  • Share this:

state_budget33प्रफुल्ल साळुंखे, मुंबई

17 मार्च :  राज्याचा अर्थसंकल्प उद्या (शनिवारी) सादर होणार आहे. आज (शुक्रवारी) राज्याचा आर्थिक पहाणी अहवाल सादर करण्यात आला. यात अनेक बाबींमध्ये राज्यानी प्रगती केली असली तरी काही बाबी अत्यंत गंभीर आहेत. राज्याचा महसुली खर्च सातत्यानं वाढत असून महसूली उत्पन्न मात्र तितक्या वेगानं वाढताना दिसत नाहीये. राज्यावर कर्जाचा बोजा सतत वाढत आहे.

या आर्थिक पहाणी अहवालात राज्यावर 3,56,223 कोटींचं कर्ज असल्याचं स्पष्ट म्हटलं आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कर्जाच्या रकमेत वाढ झाली आहे. 28,220 कोटी रुपयांची रक्कम  या कर्जाच्या व्याजापोटी द्यावी लागतेय.

यावरून राज्याची सध्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचं स्पष्ट होतं. तसंच राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार या योजनेची गती मंदावली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत जलयुक्त शिवार योजनेवर झालेला खर्च अतिशय कमी आहे. या वर्षी मंजूर झालेल्या 1400 कोटींपैकी फक्त 85 कोटी रुपये जलयुक्त शिवार योजनेवर खर्च केले आहेत.

महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2016 - 17

राज्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ

अन्नधान्य उत्पादनात विक्रमी वाढ

तृणधान्य 80 टक्के, कडधान्य 187 टक्के, तेलबिया 142 टक्के, कापूस 83 टक्के वाढ अपेक्षित

रब्बी हंगामातील उत्पादनात ही भरघोस वाढ अपेक्षित

तर उसाच्या उत्पादनात 28 टक्के घट अपेक्षित

2016 मध्ये महसुली जमेत 11.4 टक्क्यांनी वाढ

2016 - 17 मध्ये राज्याच्या स्थूल उत्पन्नात 9.4 टक्के वाढ अपेक्षित

2016 - 17 मध्ये राज्याची अपेक्षित वित्तीय तूट 35,031 कोटी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2017 04:52 PM IST

ताज्या बातम्या