सलमान-कतरिनाच्या 'टायगर...'चं शूटिंग सुरू

सलमान-कतरिनाच्या 'टायगर...'चं शूटिंग सुरू

  • Share this:

salman-kat

17 मार्च : दिग्दर्शक अब्बास अली जफरचा 'टायगर जिंदा है' या सिनेमाचं शूटिंग आॅस्ट्रेलियात सुरू झालंय. 'टायगर'च्या या सिक्वलमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. आणि या शूटिंगच्या निमित्तानं त्यांच्यातला दुरावा संपल्याचंच दिसतंय.

काही दिवसांपूर्वी दोघांनाही मुंबई विमानतळावर एकत्र पाहिलं होतं.  नंतर सलमान खाननंही सोशल वेबसाइटवर आपले काही फोटोज शेअर केले. त्यावरून दोघंही शूटिंगमध्ये बिझी असल्याचं कळतंय.

या जोडीनं प्रमोशनही सुरू केलंय. सलमान खान आणि कतरिना कैफ ही जोडी नेहमीच लोकांनी पसंत केलीय.कतरिनाचं रणबीरबरोबर ब्रेकअप झालंय. सलमान-लुलियाचं रिलेशनशिपही आॅन-आॅफ होतंय. त्यामुळे प्रेक्षकांना दोघांनी सिनेमाप्रमाणे खऱ्या आयुष्यातही एकत्र यावं हे वाटतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2017 04:10 PM IST

ताज्या बातम्या